फसवे विज्ञान म्हणजेच छद्मविज्ञान
About This Course
छद्मविज्ञान:
गेल्या दिवाळीमध्ये शेजारच्या काकूंनी वेगळ्या प्रकारचे दिवे त्यांच्या दारात लावले होते. मी कुतूहलाने विचारल्यावर त्यांनी सांगितले की, ते पंचगव्य दिवे आहेत. त्या अगदी उत्साहाने सांगू लागल्या, या दिव्यांमुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते. हे दिवे पंचगव्यांनी बनलेले आहेत. पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणार्या पाच गोष्टी – शेण, गोमूत्र, दूध, दही आणि तूप. हे दिवे जळताना हवेमध्ये ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होते, जशी आपल्या दारातली तुळस देखील तिच्या औषधी गुणधर्मांनी वातावरण शुद्ध ठेवते. काकूंनी एका श्वासात वरची सगळी वाक्ये पूर्ण केली.
Curriculum
9 Lessons