About us
October 20, 2020 2025-11-18 7:42About us
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संचलित डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ हे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी स्थापन केले गेले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संचलित
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ
वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारासाठी एक ऑनलाइन अभ्यास केंद्र
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चालवले जाणारे हे केंद्र समाजात विज्ञान आणि तर्कशुद्ध विचार रुजविण्यासाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.
जागरूकतेमुळे बदललेली मने
तज्ञ व कार्यकर्ते
अभ्यास साहित्य
Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/anisvidy/public_html/wp-content/plugins/elementor/includes/base/widget-base.php on line 224
Warning: Undefined array key -1 in /home/anisvidy/public_html/wp-content/plugins/elementor/includes/base/controls-stack.php on line 696
Warning: Trying to access array offset on value of type bool in /home/anisvidy/public_html/wp-content/plugins/elementor/includes/base/widget-base.php on line 224
Warning: Undefined array key -1 in /home/anisvidy/public_html/wp-content/plugins/elementor/includes/base/controls-stack.php on line 696
अभ्यासक्रम
भूत, भानामती, करणी, अंगात येणे, वास्तुशास्त्र, फलज्योतिष, नवस, बुवा-बाबांची कृपा, यंत्र-तंत्र, काळी जादू, चमत्कार, आणि यांसारख्या इतर विषयांबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती हे विविध अभ्यासक्रम मोफत पूर्ण करू शकेल. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या अभ्यासक्रमात भाग घेऊ शकतात. या लोकविद्यापीठातील अभ्यासक्रम तीन टप्प्यांत विभागलेला आहे. तुम्हाला रस असलेल्या कोणत्याही टप्प्यावरील कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम थेट देखील पूर्ण करता येईल.
1
पहिल्या टप्प्यात खालील अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत
१) भुताने झपाटणे म्हणजे काय? २) अंगात येणे, म्हणजे? ३) वैज्ञानिक दृष्टीकोन-1 ४) फसवे विज्ञान म्हणजेच छद्मविज्ञान ५) व्यसन म्हणजे काय? ६) वास्तुशास्त्र एक थोतांड
2
दुसऱ्या टप्प्यामध्ये खालील अभ्यासक्रम उपलब्ध केले जातील
१) बुवाबाजी-1 २) बुवाबाजी-2 ३) नवसाच्या पशुहत्त्या ४) भानामती ५) स्त्रिया आणि अंधश्रद्धा ६) सर्पविज्ञान
3
तिसऱ्या टप्प्यामध्ये खालील अभ्यासक्रम उपलब्ध केले जातील
१) वैज्ञानिक दृष्टीकोन-2 २) फलज्योतिष्य ३) श्रद्धा- अंधश्रद्धा ४) संतांचे विचार व अंधश्रद्धा निर्मूलन ५) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेमके काय काम करते?
🎓 अभ्यासक्रमाची रचना आणि मूल्यमापन प्रक्रिया
प्रत्येक विषयाच्या वाचनासाठी साधारण तीन हजार शब्दांचा सचित्र मजकूर दिलेला आहे. काही व्हिडिओ लिंक दिलेल्या आहेत. ती लिंक वापरुन यूट्यूबवर जाऊन ते व्हिडिओ बघायचे आहेत. वाचन करून झाल्यानंतर स्वतःच स्वतःचे आकलन तपासता यावे यासाठी प्रश्नमालिका दिलेली आहे. ७५% पेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरे बरोबर आल्यास त्या विषयाचे आकलन झालेले आहे असे समजून त्या अभ्यासक्रमाचे मान्यवरांच्या सहीचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येईल. एखाद्या अभ्यासक्रमात जोपर्यंत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत कितीही वेळा त्या अभ्यासक्रमाची मूल्यमापन चाचणी घेता येईल. प्रत्येक विषयाच्या अधिक अभ्यासासाठी लेख, पुस्तके, मुलाखती यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत. ज्यांना अधिक जाणून घेण्यात रस आहे ते त्यांचा वापर करू शकतील.
डॉ. नरेंद्र दाभोलकर
( संस्थापक )
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी समाजात विवेकवादी विचार रुजावा यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले व त्याच विचारांसाठी ते शहीद झाले. तरुणांशी बोलताना ते नेहमी सांगायचे की, या विचारांनी जग बदलेल की नाही ते मला माहीत नाही, परंतु तुमचे आयुष्य नक्की बदलेल याची मी तुम्हाला खात्री देतो. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित तर्कशुद्ध विचार करता येऊ लागला की आपले मन निर्भय बनते, स्वतःच्या कर्तृत्वावरील आपला विश्वास वाढतो व त्यातून निर्माण झालेला आत्मविश्वास ही आपण स्वतःला दिलेली सर्वोत्तम भेट ठरते. प्रत्येकाला स्वतःला ही भेट देता यावी यासाठी हे लोकविद्यापीठ निर्माण करण्यात आले आहे. लोक त्याचा अधिकाधिक वापर करतील अशी आशा आणि अपेक्षा आहे.