अंगात येणे म्हणजे काय ?
About This Course
एकदा मी माझ्या दवाखान्यात पेशंट तपासत बसलो होतो. तेवढ्यात माझा एक डॉक्टर मित्र लगबगीने आत शिरला आणि मला म्हणाला,
“तुझा विश्वास नाही ना. चल माझ्याबरोबर. आमच्या शेजारी पूजा सुरू आहे आणि काहींच्या अंगात आलं आहे. अनेक माणसे त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यांची उत्तरे एक बाई देत आहे. तू ये आणि खात्री करून घे.”
मी त्याला म्हणालो, “मी येण्याची काही गरज नाही.” माझ्या खिशातून एक नोट काढून मी त्याला दिली आणि त्याला सांगितले, “ही नोट तू घेऊन जा. या नोटेचा नंबर काय आहे असा प्रश्न तू त्यांना विचार. तूच खात्री करून घे.”
तो पटकन म्हणाला, “असले प्रश्न विचारायचे नसतात. “मग मी त्याला समजावून सांगितले, “खरेच जर एखादी देवता अंगात येऊन त्या व्यक्तीला प्रश्नांची उत्तरे देता येत असतील तर आपण त्यांना ‘अतिरेक्यांचा हल्ला कोठे आणि कधी होणार आहे’ असा प्रश्न विचारू शकतो. किंवा ‘या चोराने चोरलेले धन कुठे लपवले आहे’ असे विचारू शकतो. परंतु अशा प्रश्नांची बरोबर उत्तरे कधीही दिली जात नाहीत. ‘मुलीचे केव्हा लग्न होईल’ असे नेमके उत्तर नसलेले प्रश्न विचारले जातात. अशा प्रश्नांची गोलमाल उत्तरे दिली जातात.”
माझा मुद्दा माझ्या मित्राच्या लक्षात आला. पण तो म्हणाला, “मग अंगात येते म्हणजे नेमके काय होते?” तेच आपल्याला समजून घ्यायचे आहे.